
भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील चार्ज फ्रेमची (दोषनिश्चिती) पुढील सुनावणी आता येत्या 1 ऑक्टोबरला होणार आहे. जिल्हा न्यायालयात आज या संबंधीची सुनावणी होती.
कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) 12 संशयितांवर कारवाई केली. या प्रकरणाचा तपास दहशवादविरोधी पथकाकडे (एटीएस) आता वर्ग करण्यात आला आहे. या संबंधीची पुढील सुनावणी कोल्हापुरातच व्हावी, असा प्रस्ताव एटीएसकडून शासनाला पाठविण्यात आला होता. शासनाकडून हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 30 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. तर, जिल्हा न्यायालयाने या संबंधीची पुढील सुनावणी 1 ऑक्टोबरला ठेवली आहे. यावेळी विशेष सरकारी वकील शिवाजी राणे उपस्थित होते.



























































