निळू फुले यांच्या बायोपिकला पुढच्या वर्षीचा मुहूर्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार निळू फुले यांच्यावर बायोपिक बनविण्यासाठी टिप्स इंडस्ट्रीजने पुढाकार घेतला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटात खलनायकी भूमिकांसाठी ओळखल्या जाणारे निळू फुले आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कसे होते हे पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. एक अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता हे दोन्ही कार्य निळू फुले यांनी कशाप्रकारे पार पाडले, एका अभिनेत्याचे जीवन, त्यांच्या जीवनातील चढ-उतार ह्या सर्व गोष्टी चित्रपटात मांडण्यात येणार आहेत.

याबाबत टिप्स इंडस्ट्रीजचे कुमार तौरानी म्हणाले, ‘मराठी चित्रपटसृष्टीत निळू फुले यांचे खूप मोठे योगदान आहे आणि हा चित्रपट त्यांच्यासाठी एक सन्मान आहे. आम्ही त्यांची मुलगी गार्गी फुले यांच्याकडून चित्रपटासाठी हक्क मिळवले आहेत’ तर दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, ‘निळू फुले यांच्यासोबत काम करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव होता. ते माझ्यासाठी गुरूप्रमाणे आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक माहीत नसलेल्या गोष्टी आम्ही चित्रपटातून लोकांसमोर आणू.’ हा बायोपिक 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.