खिडकीवाटे घरात घुसून चोराची हातसफाई, नशेबाज गुन्हेगार गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सगळे झोपलेले असताना खिडकीवाटे घरात घुसून मोबाईल व रोख रक्कम घेऊन एक नशेबाज पसार झाला होता. घरपह्डी करण्यात तो यशस्वी झाला, पण ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी त्याला 24 तासांच्या आत गजाआड केले.

दिनकर (नाव बदललेले) हे आज सकाळी झोपेतून उठले असता त्यांना त्यांचा मोबाईल व 20 हजारांची रोकड जागेवर नसल्याचे आढळून आले. शोधाशोध करूनही न सापडल्याने घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दिनकर यांनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नौशाद तांबोळी व पथकाने तपास सुरू केला.

घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याबरोबर खबऱयांना कामाला लावले असता मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोअर परळ येथे राहणारा गणेश ठाकूर (20) या सराईत चोराने ही घरपह्डी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तांबोळी व पथकाने तत्काळ शोधाशोध करून गणेशला 24 तासांच्या आत पकडले.