कबड्डीत महाराष्ट्राच्या महिला फायनलमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय रेडर सोनाली शिंगटे, कर्णधार स्नेहल शिंदे आणि पूजा यादव यांच्या सर्वोत्कृष्ट खेळीच्या जोरावर महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. महाराष्ट्र संघाने पहिल्यांदाच नॅशनल गेम्सची फायनल गाठण्याचे विक्रमी यश संपादन केले. शनिवार, 1 ऑक्टोबरला महाराष्ट्र महिला संघ किताब पटकावण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

स्नेहलच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला संघाने शुक्रवारी उपांत्य सामन्यात तामीळनाडू टीमला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने 45-25 अशा 20 गुणांच्या फरकाने तामीळनाडूचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केला. बोनसची स्टार सोनाली शिंगटे, कर्णधार रेडर स्नेहल आणि पूजा यादवने साजेशी खेळी करताना संघाला पहिल्या हाफमध्ये मोठी आघाडी मिळवून दिली. याशिवाय पकडीमध्ये अंकिता जगताप, रेखा सावंत, सायली यांनीही सर्वोत्तम खेळी केली.