
इंडोनेशियात फुटबॉल सामन्यानंतर मैदानावरच भयंकर हिंसाचार घडला आहे. दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये सामन्यानंतर तुफान हाणामारी झाली या हिंसाचारात 127 जणांचा मृत्यू झाला असून 180 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. इंडोनेशियाातील पूर्व जावा भागात ही घटना घडली आहे.
#WATCH | At least 127 people died after violence at a football match in Indonesia, last night. The deaths occurred when angry fans invaded a football pitch after a match in East Java
(Video source: Reuters) pic.twitter.com/j7Bet6f9mE
— ANI (@ANI) October 2, 2022
अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय या संघांमध्ये सामना रंगला होता. मात्र, सामन्यात पर्सेबाया सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करत 3-2 ने सामना जिंकला. या सामन्यानंतर पराभूत झालेल्या अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घातला. यावेळी नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी आश्रू धुराच्या कांड्याचा मारा केला. या हिंसाचारात 127 जणांचा मृत्यू झाला.




























































