
वैद्यकशास्त्रातील 2022 चे नोबेल पारितोषिक स्वांते पाबो यांना जाहीर झाले आहे. मानव विकासाशी संबंधित शोधासाठी स्वांते यांना गौरवण्यात आले आहे. एका नामशेष होमिनिनचा शोध त्यांनी लावला आहे. स्वांते यांचा जन्म स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे 1955 साली झाला होता. ते सध्या जर्मनीच्या मॅक्स फ्लेक इन्स्टिटय़ुट ऑफ इव्हॅल्युशन एंथ्रोपोलॉजी सोबत काम करत आहेत. तसेच जपानच्या ओकिनावा इन्स्टिटय़ुट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीचाही भाग आहेत.


























































