मयूरी वाघ एकवीरा आईच्या भूमिकेत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेहमी वेगवेगळय़ा भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मयुरी वाघ आता पुन्हा एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी मयुरी वाघ एक वेगळी व्यक्तिरेखा साकारत आहे, ती म्हणजे एकवीरा आईची व्यक्तिरेखा! नेहमी भक्तांच्या पाठीशी असणारी आई एकवीरा, भक्तांना संकटातून कशी तारून नेईल, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ हे या नव्या मालिकेचे नाव असून सोनी मराठी वाहिनी ही मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या प्रोमोत एकवीरा आईच्या वेषातील मयुरी वाघ प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे.

मयुरी वाघ आई एकवीराची भूमिका कशा प्रकारे निभावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मयुरीव्यतिरिक्त या मालिकेत अमृता पवारही छोटय़ा पडद्यावर परत दिसणार आहे.