
वंदे भारत एक्सप्रेसच्या अपघातांची मालिका सुरुच असून आज पुन्हा एकदा या एक्सप्रेसला अपघात झाला. समोर आलेल्या वाहनाला धडक दिल्याने एक्सप्रेसच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. गुजरातमधील वलसाड जवळील अतुल रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली.
A cattle runover incident occurred with passing Vande Bharat train today near Atul in Mumbai Central division at 8.17 am. The train was on its journey from Mumbai Central to Gandhinagar. Following the incident, the train was detained for about 15 minutes: Indian Railways pic.twitter.com/b6UoP3XrVe
— ANI (@ANI) October 29, 2022
मुंबई एक्सप्रेसवरून गांधीनगरला निघालेल्या या एक्सप्रेसला सकाळी आठच्या सुमारास ही अतुल रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला. त्यानंतर तब्बल अर्धा तास ही ट्रेन एकाच जागी उभी होती. या अपघातामध्ये रेल्वेच्या कपलरच्या कव्हरचंही नुकसान झालं असून बीसीयू कव्हरचंही नुकसान झाल्याचं सांगितलं दात आहे. याशिवाय, रेल्वेमध्ये पाणीपुरवठा करणारा पाण्याचा पाईपदेखील नादुरुस्त झाला आहे.
गेल्या महिनाभरात वंदे एक्सप्रेसला अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे. पंतप्रधानांनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशी अहमदाबाद जवळ या एक्सप्रेसला अपघात झाला होता. त्यावेळीही रेल्वेच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले होते.



























































