माथेरानच्या मिनी ट्रेनसमोर अज्ञातांनी रुळ आडवा टाकला, ड्रायव्हरने वेळीच ब्रेक दाबल्याने अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माथेरानच्या मिनी ट्रेनला घातपात करण्याच्या दृष्टीने अज्ञात समाजकंटकानी तिच्या रुळावर रुळाचा तुकडा आडवा टाकल्याचे वेळीच पाहून या ट्रेनच्या पायलटने वेळीच ब्रेक दाबल्याने पुढील अनर्थ टळल्याची घटना काल माथेरान येथे घडली.

या घटनेतील तत्परता दाखविणार्‍या लोको पायलट आणि सहायक लोको पायलट यांचे कौतूक होत आहे. गेले तीन वर्षे बंद असलेली नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनची थेट सेवा दिवाळीच्या मुहुर्तावर सुरू झाली आहे. माथेरान ते नेरळ अशा प्रवासात रविवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास लोको पायलट दिनेश चंद मीणा व सहायक लोको पायलट सुधांशु पी. यांना एनएम – 140 जवळ कोणीतरी रुळांवर रुळाचा तुकडा आडवा टाकल्याचे दिसले. त्यांनी लागलीच आपात्कालीन ब्रेक दाबत ट्रेन थांबवली. त्यामुळे एक मोठी दुर्घटना होण्याचे टळले गेले, त्यामुळे प्रसंगावधान दाखविणार्‍या लोको पायलट आणि सहायक लोको पायलट यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.