
मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्य नियंत्रण कक्षाला तब्बल चार ‘आयएसओ’ मानांकने मिळाली आहेत. देशात कुठल्याही मुख्य नियंत्रण कक्षाला एकाच वेळी चार मानांकने मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याने अग्निशमन दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. उत्कृष्ट नियोजन, व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी ही मानांकने मिळाली आहेत.
कुठल्याही प्रकारच्या दुर्घटनेत सुयोग्य व्यवस्थापन, तत्परता, सुरक्षितता, वेग आणि नियोजन आवश्यक असते. यानुसार काम केल्यामुळे अग्निशमन दलाला ही मानांकने मिळाली आहेत. या ‘आयएसओ’ मानांकनांमुळे नियंत्रण कक्षाची सेका गुणकत्तेमध्ये वाढ होऊन आणखी प्रभावीपणे काम करणे शक्य होणार असल्याचे प्रमुख अग्निशमन दल अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या या कामगिरीचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी कौतुक केले आहे. ही ‘आयएसओ’ मानांकने मिळण्यामध्ये विभागीय अग्निशमन अधिकारी आणि प्रोजेक्ट हेड रमेश भोर यांचे प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत. ही सर्व ‘आयएसओ’ मानांकने अमेरिका मान्यताप्राप्त आहेत.
असे चालते अग्निशमन दलाचे काम
– मुंबई अग्निशमन दलाची 35 अग्निशमन केंद्रे असून 19 लघु अग्निशमन केंद्रे आहेत. अग्निशमन दलाचे मुख्यालय भायखळा येथे आहे, तर प्रत्येक अग्निशमन केंद्रात उपनियंत्रण कक्ष आहे. आपत्कालीन स्थितीत नागरिकांकडून 101 क्रमांकाकर माहिती दिली जाते. हा कॉल मुख्य नियंत्रण कक्षातील संगणकाकर डिसप्ले होतो.
– येथील जीपीएस सिस्टीमद्वारे कॉलचे ठिकाण कळते. याकरून कॉल कोणत्या अग्निशमन केंद्राच्या हद्दीतील आहे, हेदेखील समजते. मग सिस्टीमद्वारेच आलेला कॉल संबंधित अग्निशमन केंद्राच्या उपनियंत्रण कक्षाला पाठकून तिथे त्या कॉलसंदर्भातील संपूर्ण माहिती डिसप्ले होते. मुख्य नियंत्रण कक्षाने दिलेली माहिती आणि घटनास्थळी किती गाडय़ा सोडायच्या हे ठरवले जाते.
अशी मिळाली मानांकने
– दर्जेदार व्यवस्थापन प्रणालीकरिता ‘आयएसओ’ मानांकन 9001ः2015
– पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीकरिता ‘आयएसओ’ मानांकन 14001ः 2015
– आरोग्य आणि सुरक्षितता व्यवस्थापन प्रणालीकरिता ‘आयएसओ’ मानांकन 45001ः2018
– माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीकरिता ‘आयएसओ/आईसी कमिटी’ मानांकन 27001ः2013
अग्निशमन दल प्रमुखपदी मांजरेकर
मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुख अग्निशमनपदी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांची आज नियुक्ती झाली आहे. प्रमुख अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार हेमंत परब यांनी मांजरेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
याआधीचे प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब हे गेल्या 33 वर्षांपासून अग्निशमन दलाच्या सेवेत कार्यरत होते. सहाय्यक अग्निशमन अधिकारी ते प्रमुख अग्निशमन अधिकारीपर्यंतची धुरा परब यांनी सांभाळली. त्यांनी गेले 17 महिने प्रमुख अग्निशमन अधिकारी पद भूषविले.

























































