मालाडमध्ये पोलिसाला धक्काबुक्की 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यस्थीसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण झाल्याची घटना मालाडच्या कुरार येथे घडली. मारहाण प्रकरणी कुरार पोलिसांनी फारुख लष्करला अटक केली.

राजेश सुर्वे हे कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गेल्या आठवडय़ात ते डय़ुटीला होते. तेव्हा पोलीस नियंत्रण कक्षाला पह्न आला. मालाडच्या पठाण वाडी येथे एक जण त्याच्या आईला मारहाण करत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सुर्वे हे घटनास्थळी गेले. तेव्हा फारुख हा त्याच्या आईला शिवीगाळ करत होता. त्यामुळे पोलिसांनी फारुखला पोलीस ठाण्यात आणले.

 पोलीस ठाण्यात आणल्यावर फारुख हा पोलिसांशी वाद घालत होता. पोलीस फारुखला शांत राहण्यास सांगत होते. तेंव्हा फारुखने सुर्वे आणि ढगे याची कॉलर पकडून शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार डय़ुटीवर असलेले उपनिरीक्षक मेदगे याच्या लक्षात आला. त्यानंतर मेदगे हे तेथे गेले. तेव्हादेखील फारुख हा पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुकी करत होता. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कुरार पोलिसांनी फारुखविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली गेली.