बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त 100 उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॅरिस्टर नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष 100 विविध उपक्रमांचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने साजरे करण्यात आले. मालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने वर्षभर या उपक्रमांचे आयोजन सिंधुदुर्ग जिह्यातील विविध भागात करण्यात आले होते. यात कवितासंग्रह व पुस्तक प्रकाशन, ऑनलाइन वाचन स्पर्धा, विविध विषयांवर व्याख्याने, राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा, वारकरी कीर्तन महोत्सव, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक सहकार्य आदी उपक्रमांचा समावेश होता.

जन्मशताब्दी सोहळय़ाच्या समारोपावेळी ज्येष्ठ पत्रकार विनोद शिरसाठ यांचा बॅ. नाथ पै पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच दीपक भोगटे यांच्या शंभर चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. बॅ. नाथ पै सेवांगण विश्वस्त मंडळावर अॅड. देवदत्त परुळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, दीपक भोगटे, अरविंद परुळेकर, शैलेश खांडाळेकर, दिगंबर सामंत, पद्मनाथ शिरोडकर हे कार्यरत असून आपल्या पदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. या संस्थेच्या स्थापनेपासूनच सेवांगण बालविकास प्रकल्प, साने गुरूजी वाचन मंदिर, काwटुंबिक सल्ला पेंद्र, रुग्णांसाठी अन्नदान, व्यसनमुक्ती अभियान, मालवणी भाषा संवर्धन पेंद्र, शैक्षणिक व आरोग्य निधी सहाय्य, विविध पुरस्कारांचे वाटप आदी विविध उपक्रम राबवले जात आहेत.