
सध्या अकोला दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अकोल्यातील कट्टर शिवसैनिक असलेल्या मुरली सुर्वे यांच्या प्रसिद्ध मुरली टी सेंटरला भेट दिली. आदित्य ठाकरे यांनी स्वत: याबाबत ट्विट करून माहिती दिली. तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा जेव्हाही अकोला दौऱ्यावर यायचे त्यावेळी ते या टी सेंटरला भेट द्यायचे अशी आठवणही आदित्य ठाकरे यांनी इथे सांगितली आहे.
अकोला शहरातील कट्टर शिवसैनिक मुरली सुर्वे यांच्या प्रसिद्ध ‘मुरली टी सेंटरला’ भेट दिली. मा.बाळासाहेब अकोला दौऱ्यावर असताना या चहाच्या दुकानाला आवर्जून भेट देत. यानिमित्ताने शिवसैनिक आणि बाळासांहेबांमधल्या भावनिक नात्याची पुन्हा प्रचिती आली. pic.twitter.com/KoCaTY1vAM
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 7, 2022
”अकोला शहरातील कट्टर शिवसैनिक मुरली सुर्वे यांच्या प्रसिद्ध ‘मुरली टी सेंटरला’ भेट दिली. मा.बाळासाहेब अकोला दौऱ्यावर असताना या चहाच्या दुकानाला आवर्जून भेट देत. यानिमित्ताने शिवसैनिक आणि बाळासांहेबांमधल्या भावनिक नात्याची पुन्हा प्रचिती आली.” असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
श्री राजराजेश्वर मंदिरात घेतले दर्शन
आदित्य ठाकरे यांनी अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन त्यांनी पुष्पहार अर्पण करत दर्शन घेतले. यावेळी शिवसैनिकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.

































































