इलेक्ट्रॉनिक शोरूममधून महागड्या वस्तूंची चोरी करणाऱ्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूममधून महागड्या वस्तूंची चोरी करणार्‍या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून घड्याळे, ब्ल्यूट्यूथ साऊंड आणि अन्य साहित्य, असा 31 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रौनक राजेंद्र थोरात, टिनुज विलास कोळमकर (रा. दोघे. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील कोळमकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दोघांनी मिळून भारती विद्यापीठ भागातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणार्‍या एका शोरूममधून महागड्या वस्तू चोरून नेल्या होत्या. तेव्हापासून पोलीस आरोपींच्या मागावर होते.

यादरम्यान आरोपी हे येरवडा भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून महागडी घडाळे, ब्ल्यूट्यूथ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल रसाळ, अंमलदार हर्षल शिंदे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.