सिग्नल यंत्रणेत बिघाड, ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी रेल्वे स्थानकाच्या जवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची अप आणि डाऊन जलद मार्गाची वाहतूक सकाळी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. तर मध्य रेल्वेच्या लोकलही सकाळच्या पिकअवरमध्ये उशिराने धावत होत्या. त्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या चाकरमान्यांना कामावर पोहचताना गर्दीचा सामना करावा लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंधेरी स्थानकाजवळ सकाळी 8.36 वाजण्याच्या सुमारास पॉइंट फेल झाल्याने सिग्नल यंत्रणा ठप्प झाली. त्यामुळे विरार आणि चर्चगेटच्या दिशेने जाणाऱया जलद लोकलची वाहतूक धिम्या मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे लोकल ट्रेनची गर्दी प्रचंड वाढली. अर्ध्या तासानंतर स. 9.12 वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणा दुरुस्त झाली. त्यानंतरही तासभर लोकल वाहतूक उशिराने धावत होत्या.