
हटके विषय आणि अनोखे कथानक घेऊन चाहत्यांना भेटणारा आमीर खान त्याच्या ‘चॅम्पियन्स’ या आगामी चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. आमीरने नुकतीच दिल्ली येथे बालपणीच्या मित्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
त्यावेळी त्याने अभिनयातून काही काळ ब्रेक घेत असल्याचे सांगितले. आमीर म्हणाला, मी 35 वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करत आहे. माझे पूर्ण लक्ष माझ्या कामावर आहे. मला वाटते की, माझ्या जवळच्या लोकांसाठीहे चांगले नाही. हीच ती वेळ आहे, जेव्हा मी त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. मी पुढचे दीड वर्ष अभिनेता म्हणून काम करणार नाही, पण या काळात निर्माता म्हणून काम करणार.
‘चॅम्पियन्स’ चित्रपटाविषयी आमीर म्हणाला, ही एक उत्कृष्ट स्क्रिप्ट आहे आणि एक सुंदर कथा आहे. हा एक अतिशय हृदयस्पर्शी आणि सुंदर चित्रपट आहे.




























































