पूर्ववैमनस्यातून दुहेरी खुनातील फरारी हल्लेखोरांना अटक, येरवडा पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्ववैमनस्यातून दुहेरी खून करून फरारी झालेल्या हल्लेखोरांना अटक करण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. ही घटना 11 नोव्हेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास येरवडा परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये घडली होती. न्यायालयाने आरोपींना 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिवशंकर अंजनकुमार हरगुड (20), साहिल राम कांबळे(20), कृष्णा राजू पवार (23), निशांत तायप्पा चलवादा (20), रोहित परशुराम सणके (21), गौरव ऊर्फ साहिल रवी चव्हाण (20), सोनु शंकर राठोड (23) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. यापुर्वी शंकर मानु चव्हाण (54, रा. येरवडा) आणि बादल शंकर चव्हाण (25) यांना अटक केली आहे. अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष ऊर्फ किसन राठोड अशी खून झालेल्यांची नावे आहेत.

दुहेरी खूनातील आरोपी वाघोली परिसरात थांबल्याची माहिती येरवडा तपास पथकातील उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे आणि पोलीस अंमलदार दत्ता शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम करीत आहेत. ही कामगिरी उपायुक्त रोहिदास पवार, एसीपी किशोर जाधव, वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, प्रदिप सुर्वे, संदिप राऊत, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, अमजद शेख, कैलास डुकरे, किरण घुटे, सागर जगदाळे, उत्तम गट, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओबासे यांनी केली आहे.