चीनपासून श्रीलंकेपर्यंत सर्वांचा डीएनए एकच! सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनच्या पठारी भागापासून ते श्रीलंकेच्या दक्षिणेपर्यंत सर्वांचा डीएनए एकच असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला. प्रत्येकाची स्वतःची भाषा आहे तसेच खाद्यसंस्कृतीही आहे. भौगोलिक क्षेत्राचा परीघ लक्षात ठेवूनच ही रचना करण्यात आली असून, त्यावर ठाम राहिले पाहिजे, असे मतही भागवत यांनी व्यक्त केले

छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपले सर्वांचे पूर्वज सारखेच असल्याच्या मताचा पुनरुच्चार केला.

संघ निमलष्करी संघटना नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही निमलष्करी संघटना असल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र तसे नाही. व्यायाम म्हणून संघात लाठय़ा चालवण्याचे शिक्षण दिले जाते. येथे कबड्डीही शिकवली जाते. आपण जसे आहेत, तसेच दुसऱयालाही समजतो. संघाच्या बाबतीत असेच झाले आहे. संघ समजून घ्यायचा असेल तर संघात या, असे आवाहनही मोहन भागवत यांनी केले. प्रत्येकाच्या पुजा पद्धतीचाही आदर करा, असे ते म्हणाले.