सौर प्रकल्पासाठीच्या जमिनीला 75 हजार रुपये भाडे मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील शेतकऱयांना खूशखबर आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनींतर्गत उभारल्या जाणाऱया सौर प्रकल्पांसाठी वीज उपपेंद्राच्या परिसरातील जमीन महावितरणने भाडय़ाने घेतली आहे. त्यासाठी प्रतिहेक्टरला वार्षिक तब्बल 75 हजार रुपये भाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जमीन भाडय़ाने देणाऱया शेतकऱयांसह इतर जमीनदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महावितरणकडून कृषी वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार तीन हजार कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार असून याकरिता 15 हजार एकर जमिनीवरून सुमारे चार हजार मेगावॅट विजेची निर्मिती करण्याची योजना आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जमीन वीज प्रकल्पासाठी उपलब्ध व्हावी म्हणून महावितरणने भाडेवाढ केली आहे.

z सौर कृषी वाहिनी योजनेसाठी घेण्यात येणारी जमीन महावितरणच्या वीज उपपेंद्राच्या 5 किलोमीटर परिघात असणे बंधनकारक आहे. सदर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महावितरणने ऑनलाईन लॅण्ड पोर्टल सुरू केले आहे. जमीन तातडीने उपलब्ध व्हावी म्हणून प्रत्येक जिह्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.