
समुद्राच्या खोल पाण्यात अनेक रहस्ये दडलेली असतात. या रहस्यांचा शोध लागला की, सर्वसामान्य व्यक्तीच काय पण शास्त्रज्ञही थक्क होतात. नुकताच अशा एका प्राण्याचा पहिल्यांदाच शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे. या प्राण्याविषयी शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
शास्त्रज्ञांना समुद्रात खोलवर असे काही छोटे जीव सापडले आहेत जे सरड्यासारख्या माशासारखे आहेत. या जीवांचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांचे दात अतिशय तीक्ष्ण असतात. हिंदी महासागराच्या काही दुर्गम भागात हे प्राणी महासागराच्या तळाशी शास्त्रज्ञांना दिसले आहेत. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांच्या पथकाने सुमारे 3 मैल खोलवर एक डोळा असलेले ईल आणि काही लहान मासे सापडले आहेत.
ऑस्ट्रेलियातील म्युझियम्स व्हिक्टोरिया रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांना मरीन पार्कमध्ये वटवाघूळसारखे मासे, आंधळे ईल आणि सरडे मासे सापडले. हे कोकोस बेटाजवळ आहेत. ऑस्ट्रेलियातील पर्थपासून खूप दूर अंतरावर कोकोस द्वीप आहे. येथे शास्त्रज्ञांचे पथक काही जीवांचे नमुने गोळा करत होते. तेव्हा तेथे त्यांना एक ईल मासा दिसला. ज्याने दोन लहान ईल्सना जन्म दिला होता. यावेळी शास्त्रज्ञांना तेथे हायफिन लिझार्ड मासाही सापडला. या माशांना ब्लेडसारखे धारदार दात होते तसेच ते नर-मादी या जातीत विकसित होत होते.
हे प्राणी पाहून शास्त्रज्ञ थक्क झाले. या भागात संशोधनासाठी आलेल्या शास्त्रज्ञांना असे अनेक सागरी जीव एकत्र सापडले, जे त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. वटवाघळासारखे दिसणारे काही माशांचे पंख असे होते की, ते समुद्राच्या तळाशी चालू शकत होते. दुसरीकडे, वायपरफिश नावाच्या माशाच्या पोटात विजेची एक रेषा जळत राहते, ज्यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा होतो. लाइव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार, म्युझियम्स व्हिक्टोरिया रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ ओ हारा यांनी त्यांना आढळलेल्या समुद्रातील या जीवांना ‘फॅशनेबल मासे’, असे म्हटले आहे. याचे कारण म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेल्या या प्रत्येक जीवांकडे काही ना काहीतरी वेगळे आहे.
























































