राज्यपालपदावर आहात म्हणून मान राखतो – राज ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपलं वय काय? बोलतात काय? राज्यपाल पदावर बसला आहात म्हणून मान राखतो अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली.

गोरेगाव येथे आयोजित मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला. गुजराती-मारवाडी लोक मुंबईतून गेले तर पैसा राहाणार नाही आणि मुंबईची ओळख आर्थिक राजधानी म्हणून राहाणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गुजराती व मारवाडी लोकांना पहिल्यांदा विचारा की, तुमच्या राज्यातून उद्योगासाठी महाराष्ट्रात का आलात? उद्योगधंद्यासाठी महाराष्ट्राची भूमी सुपीक आहे म्हणून दुसऱ्या राज्यातील लोक येथे उद्योग व्यवसायासाठी येतात. महाराष्ट्र मोठा होता आणि महाराष्ट्रात काय आहे हे कोश्यारींकडून ऐकण्याची गरज नाही.