चिंदरची ग्रामदेवता गावभेटीला निघाली, डाळपस्वारीला धुमधडाक्यात सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मालवण तालुक्यातील चिंदर गावची ग्रामदेवता (तरंगरूपी देवता) गावभेटीसाठी निघाली आहे. श्री देव रवळनाथ मंदिरातून बुधवारी धुमधडाक्यात सुरुवात झाली. सर्व देवता, बारापाच मानकरी, रयत रोंबावळ आणि असंख्य भाविक या सोहळय़ात सहभागी झाले आहेत. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात ही स्वारी गावातील संपूर्ण देवस्थळांना भेटी देत असून गावच्या रखवालीचे गाऱहाणे ग्रामस्थांच्या तक्रारींचे निवारण करीत आहे.

दरवर्षी यात्रोत्सवापूर्वी डाळपस्वारीला सुरुवात होते. श्री देव रवळनाथ मंदिरातून निघालेली श्रींची स्वारी सातेरी मंदिरपासून आकारी ब्राह्मण देव मंदिर येथे विसावली. गुरुवारी संध्याकाळी आकारी ब्राह्मण देव मंदिरातून चिंदर बाजार पेठमार्गे खरीवाडी येथील पावणाई मंदिरात रात्री ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत पोहोचली. येथे तीन दिवस राहून चिंदर पुंभारवाडीतून श्री देव रामेश्वर मंदिर येथे विसावणार आहे. यानंतर यात्रे दिवशी रात्री श्रींची स्वारी भगवती मंदिरात पोहोचणार आहे.