सोलापुरात कर्नाटकच्या एसटीला फासलं काळं; दिला खणखणीत इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
karnataka-prahar

महाराष्ट्रातील एसटी बसेस आणि ट्रकवर कर्नाटकात दगडफेक करून वाद निर्माण करणाऱ्या कर्नाटक सरकारचा आणि कन्नड रक्षक वेदिका संघटनेचा निषेध करत आज सोलापूर शहरात करण्यात आला. यावेळी कर्नाटकच्या बसला अडवून बसवर शाईफेक करण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं.

या आंदोलन प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी आक्रमक होत कर्नाटक सरकारचा आणि कन्नड रक्षक वेदिका या संघटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आज आम्ही कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला काळं फासत आहोत येत्या काळात कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद संपला नाही तर थेट कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा तोंड काळं करू, असा इशाराही यावेळी अजित कुलकर्णी यांनी दिला.

याप्रसंगी खालीद मणियार, शहर उपप्रमुख माजिद पटेल, करमाळा तालुका प्रमुख संदीप तळेकर, आकीब नाईकवाडी आदी उपस्थित होते.