
सूर्यनमस्कार या शब्दातच सूर्य असल्याने तसेच आपल्या दिवसाची सुरवात करणारा देखील सूर्य असतो. त्यामुळे सूर्यप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही संधी असते. सूर्यनमस्कार सकाळी घालावेत, कारण दिवसाची सुरवात उत्तम होते आणि मन सुद्धा प्रसन्न होते. शरीराला लवचिक बनवते तसेच रक्ताभिसरण सुधारते, शरीरातील इतर महत्वाच्या अवयवांचे कार्य सुधारते. ज्यांना अगदीच सकाळी शक्य नसते त्यांनी संध्याकाळी घालायला हरकत नाही.
सूर्यनमस्कार लाभदायी कसे?
संपूर्ण अंगाचा यात व्यायाम होतो. रोज सूर्यनमस्कार घातल्याने आपल्या प्रवृत्ती म्हणजे कफ, वात, पित्त यांच्यात समतोल साधला जातो. आपले पोट, मज्जसंस्था, यांचे कार्य सुधारते.
सूर्यनमस्कार कुठे घालाल?
प्रत्येक गोष्टीची एक जागा ठेवून दिलेली असते. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार देखील स्वच्छ, सकाळच्या कोवळ्या किरणांमध्ये घालवेत. सूर्यनमस्कार योगा मॅटवरच शक्यतो करावेत. सूर्यनमस्कार घालताना शक्यतो सैल कपडे घालावेत. शरीराला संपूर्णपणे ताण देणारा हा व्यायाम आहे. सूर्यनमस्कार घालताना चेहरा नेहमी प्रसन्न ठेवावा.
सूर्यनमस्काराचे मानसिक फायदे :
आजच युग हे स्पर्धेचे युग मानले जाते. स्पर्धा म्हंटल की हरणे आले आणि जिंकणे आले, जिंकल्यावर जसा आनंद होतो तसेच हरल्यावर आपण जास्त दुःखी होतो. सतत दुःख कुरवाळत बसलो तर आपण कधीच प्रगती करू शकत नाही. सूर्यनमस्काराने जसे शरीरातील अवयवांचे कार्य सुधारते त्याचप्रमाणे मनाचे कार्य देखील सुधारते. सूर्यांसमकार घालणं दीर्घ श्वास घेऊन सोडायचा त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. तसेच आपला मेंदू सुद्धा कार्यक्षम राहतो. मुलांना कडून देखील सूर्यनमस्कार घालून घेतले पाहिजेत, आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांना टिकून राहण्यासाठी शरीर देखील तंदुरुस्त असायला हवे म्हणूनच त्यांनी रोज सूर्यनमस्कार घालावेत. एखाद्या मुलाला जर खेळाडू बनायचे असेल तर त्यासाठी हा उत्तम व्यायामाचा प्रकार आहे.
स्त्रियांनी सूर्यनमस्कार का घालावेत?
आजच्या स्त्रीला अनेक जवाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे साहजिकच तिचं आरोग्य चांगले असलेच पाहिजे. सूर्यनमस्कारांनी स्त्रियांच्या पोटातील स्नायूंचे कार्य सुधारते. तसेच स्त्रियांच्या शरीरात सतत हार्मोनल बदल होत असतात त्याचे कार्य देखील सुधारते. काही आसनांमुळे वाढलेल्या अतिरिक्त चरबीचे प्रमाण सुद्धा कमी होते. स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मासिक पाळी. सूर्यनमस्कारांमुळे स्त्रियांच्या मासिक पाळीत बरीच सुधारणा होते. अनेकांना अनियमित मासिक पाळीची समस्या असते, अशांनी सूर्यनमस्कार घातल्यासही समस्या कमी होऊ शकते.. एवढच नाही तर मेनोपॉजच्या वेळी होणारा त्रास आणि मानसिक त्रास देखील दूर होऊ शकतो.
सूर्यनमस्काराने किती कॅलरी खर्च होतात?
एक सूर्यनमस्कार घातल्याने सर्वसामान्य व्यक्तीच्या १३.६० कॅलरी खर्च होतात. त्यामुळे हळूहळू रोज सूर्यनमस्काराची संख्या वाढवावी, १०८ सूर्यनमस्कार घालण्याचे लक्ष ठेवावे.























































