अभिनेत्री देवोलिना अडकली लग्नबंधनात, नवरदेव पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साथ निभाना साथिया आणि बिग बॉस फेम अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी ही लग्नबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून देवोलिना तिच्या लग्नाआधीच्या सोहळ्याचे फोटो शेअर करत होती. मात्र तिने लग्नाआधी एकदाही ती कुणासोबत लग्न करतेय ते जाहीर केले नव्हते. अखेर बुधवारी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. देवोलिना तिचा फिटनेस ट्रेनर शहनवाझ शेख याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

काही दिवसांपूर्वी देवोलिनाने तिचा सहकलाकार विशाल सिंह हा तिला प्रपोज करत असल्याचा व्हिडीओ शेअऱ केला होता. त्यानंतर त्यांनी तो व्हिडीओ प्रमोशनसाठी असल्याचे म्हटले होते. विशालने देवोलिना ही त्याची बेस्ट फ्रेंड असल्याचे म्हटले होते. पण या दोघांबाबत कायम अफवा पसरत होत्या. काही दिवसांपूर्वी या दोघांनी साखरपुडा केल्याचे देखील बोलले जात होते. देवोलिनाने दोन दिवसांपूर्वी हळदीचा एक व्हिडीओ शेअऱ केला होता. त्यात विशाल देवोलिनाला मिठीत घेऊना नाचताना दिसत आहे. त्यावरून देवोलिना ही विशाल सोबतच लग्न करणार असल्याची चर्चा होती. नेटकऱ्यांना तर त्या दोघांच्या अफेयरची खात्री पटली होती. मात्र देवोलिनाने बुधवारी भलत्याच व्यक्तीला तिचा नवऱा म्हणून समोर आणले. त्यामुळे तिचे चाहतेही गोंधळात पडले आहेत.

देवोलिनाने तिचा जीम ट्रेनर शहनावाझ सोबत लग्न केलं आहे. तिने त्यांचे लग्नानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यासोबत तिने ‘दिवा घेऊन शोधला असता तरी असा नवरा सापडला नसता’ अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या त्या पोस्टवर तिचे इंडस्ट्रीतले सहकलाकार अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. मात्र तिचे चाहते गोंधळात पडले असून अनेकांनी तर तिला थेट तू विशाल सोबत लग्न करणार होतीस ना? असा सवाल केला आहे.