गांजा, मॅफेड्रॉनसह 9 लाख 35 हजारांचे अमली पदार्थ जप्त; मार्केटयार्ड, कोरेगावपार्क व बंडगार्डन हद्दीत कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तस्कराना अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्यांच्याकडून गांजा, मेफेड्रोन असा ९ लाख 35 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई मार्केटयार्ड, कोरेगाव पार्क व बंडगार्डन हद्दीत करण्यात आली.

अमली पदार्थ विरोधी पथक मार्केटयार्ड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना तस्कराची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सुरेश सिध्दाराम नाटेकर (वय 33 रा विजयराज अपार्टमेन्ट, प्लॅट नं 6, न्युईरा सोसायटी, गंगाधाम, मार्केटयार्ड) याला ताब्यात घेऊन 2 लाख 31 हजारांचे चरस जप्त केले.

दरम्यान, कोरेगाव पार्कमध्ये गांजा विक्रेत्याची माहिती पोलीस अंमलदार मयुर सुर्यवंशी आणि चेतन गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ओरीसा राज्यातून आलेला आकाशचंद्र पार्थव नायक (वय 27, रा. मु.पो. चांदिपुट, तहसिल मोहना, जिल्हा गजपती, राज्य ओडीसा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 लाख 84 हजारांचा 24 किलोवर गांजा जप्त केला.

पुणे स्टेशन परिसरातमेफेड्रोन विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराची माहिती पोलीस अंमलदार साहिल शेख व पोलीस अंमलदार अझिम शेख यांना मिळाली. पथकाने जावेद अजीज सय्यद (वय 33, रा. कोंढवा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 लाख 20 हजारांचे मेफेड्रोन जप्त केले
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक, एस. डी. नरके,संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, रविद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, साहिल शेख, दिशा खेवलकर, आझीम शेख, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

मोक्कातील फरारीला अटक

बनावट व विषारी ताडी बनविण्या करीता क्लोरलहाईड्रेटची विक्री करणारा मोक्का गुन्हयातील फरारी असलेल्या आरोपीस अंमली पदार्थ विरोधी पथक 2 कडुन जेरबंद करण्यात आले. निलेश विलास बांगर, (वय 40, रा. कुरकुटे वस्ती, पिंपळगांव, ता. आंबेगाव, मंचर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपी मंचर येथे येणार असल्याची बातमी पोलीस अंमलदार संदिप जाधव यांना मिळाली होती.