बीसीसीआयची ‘हल्के के मत लेलो’ प्रचार मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मास्टर कार्ड आणि हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांनी मैदानावर आणि मैदानाबाहेर लैंगिक समानतेचे समर्थन करण्यासाठी त्यांच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून संयुक्तपणे ‘हल्के के मत लेलो’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये हिंदुस्थानातील सर्वोच्च महिला क्रिकेटपटू शेफाली वर्मा, हरलीन कौर देओल आणि रेणुका सिंह यांच्या प्रवासाचे चित्रण करण्यात आले असून त्यांचा संघर्ष, कठोर परिश्रम आणि चांगली कामगिरी करण्याचा संकल्प यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

हिंदुस्थानात क्रिकेटकडे अजूनही ‘पुरुषांचा खेळ’ म्हणून पाहिले जाते आणि ‘हल्के के मत लेलो’ मोहिमेची रचना, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला क्रिकेटपटूंच्या कामगिरीचे सादरीकरण करून ही साचेबंद पद्धत मोडून काढण्यासाठी केली गेली आहे, ज्यामुळे त्यांची या खेळाप्रती असलेली बांधिलकी आणि आवड या बाबींना अधोरेखित केले गेले आहे. 9 ते 20 डिसेंबर 2022 रोजी मुंबईत होणाऱ्या हिंदुस्थान  विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला टी-20 मालिकेदरम्यान, हे चित्रपट प्रमुख सोशल मीडिया चॅनेलवर थेट प्रसारित होतील.