
रुग्णावर अतिशय सेवाभावाने इलाज करणाऱ्या एका परिचारिकेला रुग्णालयाने क्षुल्लक कारणामुळे कामावरून कमी केलं आहे. डोकेदुखी होत असल्याने स्वतःच्याच रुग्णालयाच्या फार्मसीमधून औषध घेतल्याने तिला रुग्णालयातून बाहरेचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तिच्यावर औषधं चोरल्याचा खटलाही चालवण्यात येत आहे.
या परिचारिकेचं नाव फ्रान्सेस्का मॉर्गन असं असून ती लिव्हरपूल येथील अॅरो पार्क रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. तिने रुग्णालयाच्या फार्मसीमधून डोकेदुखीच्या दोन गोळ्या घेतल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती दोन वेळा या गोळ्या घेताना दिसली होती. त्यामुळे तिच्यावर रुग्णालयाने कारवाई केली.
रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या गोळ्या फ्रान्सेस्काने घेतल्या होत्या, त्या गोळ्या घेण्यासाठी लेखी अर्ज करावा लागतो. जर परवानगी मिळाली तरच त्या गोळ्या घेता येतात. पण, असा कोणताही अर्ज न करता फ्रान्सेस्का हिने दोन वेळा गोळ्या घेतल्या होत्या.
या प्रकरणी विरल दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणी तिच्याविरुद्ध खटलाही चालवण्यात आला. त्यात ती दोषी आढळल्याने तिला रुग्णालयातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने 12 महिन्यांसाठी तिला रुग्णालयातून निलंबित करण्यात आलं आहे. तसंच तिला 144 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.



























































