क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 498 शालेय बसेस, व्हॅनवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱया 498 शालेय बसेसवर गेल्या आठ महिन्यांत कारवाई करण्यात आली. या वाहनांच्या मालकांकडून 68 लाख 17 हजार 756 रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत यासंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

विधान परिषद सदस्य राजहंस सिंह यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. शालेय बसेस आणि मारुती व्हॅनमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली असून अपघातांची शक्यताही वाढली आहे. परिवहन अधिकारीही अशा वाहनांवर कारवाई करण्यात दुर्लक्ष करतात. वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होण्याबाबत यावर काय कार्यवाही झाली असे सिंह यांनी विचारले होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, वायुवेग पथकांमार्फत शालेय बसेस, स्कूल व्हॅनसह इतर वाहनांची नियमित तपासणी करण्यात येते. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱया शालेय बसेस आणि व्हॅन्सवर एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या हद्दीत झालेल्या कारवाईची आकडेवारीही त्यांनी पुढीलप्रमाणे दिली.