आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक 1481 नोकरीच्या ऑफर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयटी मुंबईच्या इतिहासात यंदा प्रथमच प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक 1481 नोकरीच्या ऑफर्स स्वीकारण्यात आल्या आहेत. प्लेसमेंटच्या पहिल्या फेसमध्ये 25 विद्यार्थ्यांना एक कोटीपेक्षा अधिक प्रतिवर्ष पॅकेज मिळाले आहे.

रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट सेक्टरच्या सर्वसाधारण पॅकेजमध्ये वाढ झाली आहे, तर आयटी आणि सॉफ्टवेअर सेक्टरच्या सर्वसाधारण पॅकेजमध्ये घसरण झाली आहे. 1 ते 16 डिसेंबरदरम्यान आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटची फेज 1 ची सुरुवात झाली.

एकूण 283 कंपन्यांमधील देण्यात आलेल्या 1648 पैकी 1481 नोकरीच्या ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या आहेत. यात 63 आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या ऑफर्स आहेत.

– यंदा सर्वाधिक वार्षिक 3.67 कोटींचे पॅकेज विद्यार्थ्याला मिळाले असून दुसऱया क्रमांकावर वार्षिक 1.31 कोटी पॅकेजची नोकरी विद्यार्थ्याने स्वीकारली आहे.
– मागील काही वर्षांच्या तुलना केली असता फायनान्स आणि रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट सेक्टरच्या अॅव्हरेज पॅकेजमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
– तर आयटी अॅण्ड सॉफ्टवेअर सेक्टरच्या देण्यात आलेल्या अॅव्हरेज पॅकेज ऑफर्समध्ये काही प्रमाणात घट झाली आहे.

यंदाच्या प्लेसमेंट फेज 1 मधील विविध पॅकेज

– इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी – अॅव्हरेज पॅकेज – वर्षाला -21.20 लाख
– आयटी अॅण्ड सॉफ्टवेअर – अॅव्हरेज पॅकेज – वर्षाला 24.31 लाख
z फायनान्स – अॅव्हरेज पॅकेज – वर्षाला 41.66 लाख
z रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट – अॅव्हरेज पॅकेज – वर्षाला 32.25 लाख
z कन्सल्टिंग – अॅव्हरेज पॅकेज – वर्षाला 17.27 लाख