दुचाकी चोरट्या दोघांना अटक; 7 चोरीच्या दूचाकी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहर परिसरात दुचाकी चोर्‍या करणार्‍या दोघांना गुन्हे शाखा यूनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 7 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून मार्केटयार्ड, भारती विद्यापीठ, वारजे, अलंकार पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

प्रतिक चंद्रकांत मोहीते (30, रा. येरवडा), ओमकार रमेश तांदळे (20, रा. सिंहगड रोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरात वाहनचोरीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरात गस्त वाढविण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्‍यांकडून देण्यात आल्या आहेत. त्यानूसार गुन्हे शाखा यूनिट पाचचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान संशयीत दुचाकीस्वार मोहीते, तांदळे यांना मूंढवा भागातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी शहर परिसरातून साथीदाराच्या मदतीने दुचारी चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून पोलिसांनी सात दुचाकी जप्त केल्या आहेत.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट पाचचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, शहाजी काळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.