नोटाबंदीचा निर्णय योग्य की अयोग्य? आज फैसला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
हे पाच न्यायमूर्ती सध्या काय करतात याबाबत अनेकांना माहिती नाहीये. या पाचपैकी 4 न्यायमूर्ती हे आता निवृत्त झाले असून यातले एक न्यायमूर्ती हे सर्वोच्च न्यायालयात आहेत.

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 मध्ये घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्य होता की अयोग्य होता याचा फैसला उद्या सोमवार, 2 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. न्यायमूर्ती एस. ए. नजीर यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती बी. आर. गवई, ए. एस. बोपन्ना, व्ही. रामसुब्रमण्यन आणि बी. व्ही. नागरत्ना या पाच सदस्यांचे खंडपीठ याबाबतचा निर्णय देणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर करत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद ठरवल्या होत्या. सरकारचा हा निर्णय आयोग्य असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात 58 याचिका दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये नोटा बदलण्यासाठी सरकारने दिलेल्या वेळेबाबत आक्षेप नोंदवत ज्यांना वेळेत नोटा बदलता आल्या नाहीत त्यांना पुन्हा संधी द्यावी या मागणीच्या सर्वाधिक याचिका होत्या. त्यावर उद्या न्यायालय आपला निर्णय देणार आहे.

दरम्यान, सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाबाबतचे सर्व दस्ताऐवज रेकॉर्डवर ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने 7 डिसेंबर रोजी आरबीआय आणि केंद्राला देतानाच निकाल राखून ठेवला होता. यावेळी अॅटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी, आरबीआयचे वकील, याचिकाकर्त्यांचे वकील आणि ज्येष्ठ वकील पी. चिदंबरम, श्याम दिवाण यांनीही न्यायालयासमोर बाजू मांडली होती. सदरच्या निर्णयात अनेक त्रुटी असल्याचा दावा चिदंबरम यांनी केला होता.