विमानतळाची सुरक्षा आणखी होणार ताकदवान; बॉडी स्कॅनरच्या चाचण्या झाल्या पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश सौंदाळकर

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा आणखी ताकदवान होणार आहे. नवीन वर्षात विमानतळावर बॉडी स्कॅनर यंत्रणा सुरू केली जाणार आहे. बॉडी स्कॅनरमुळे अमली पदार्थ आणि सोने तस्करीच्या प्रकारांना आळा बसणार आहेत. बॉडी स्कॅनर यंत्रणा सुरू करणारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिलेच विमानतळ असणार आहे. बॉडी स्कॅनरप्रमाणे झोव्हिस यंत्रणा बसवल्याने सेन्सरद्वारे प्रवाशाची सहज माहिती मिळणार आहे.

2030 पर्यंत हिंदुस्थान हे चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाची एव्हिएशन बाजारपेठ बनणार आहे. देशातील विमानतळाची सुरक्षा ही पेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बला (सीआयएसएफ)कडे आहे. दिल्लीनंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2022 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे 19 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याच्या नोंदी आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नवीन वर्षात विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहे. नवीन वर्षात विमानतळावर बॉडी स्कॅनर यंत्रणा बसवली जाणार आहे. बॉडी स्कॅनर यंत्रणेचा फायदा सीआयएसएफला होणार आहे. बॉडी स्कॅनरमुळे प्रवाशाने शरीरात कुठे काही वस्तू लपवल्या आहेत का याची माहिती मिळणार आहेत. सध्या सीआयएसएफचे जवान हे हाती तपासणी करतात. पण या बॉडी स्कॅनरने सोने, पैसे आणि ड्रग्ज तस्करीच्या प्रकारांना आळा बसणार आहे.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही महिन्यांपासून सुरू असलेल्या बॉडी स्कॅनररच्या चाचण्या नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. त्या चाचण्यांबाबतचा अहवाल सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी ब्युरोकडे पाठवला आहे. सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी ब्युरोने हिरवा पंदील दाखवल्यावर नवीन वर्षात त्याला मान्यता मिळाल्यावर बॉडी स्पॅनर सुरू केले जाईल. त्याचा फायदा सीआयएसएफच्या जवानांना होणार असल्याचे उपमहानिरीक्षक श्रीकांत किशोर यांनी सांगितले. बॉडी स्कॅनरप्रमाणे झोव्हिस स्मार्ट यंत्रणादेखील सुरू होणार आहे. या यंत्रणेअंतर्गत विमानतळाच्या रूफ टॉपवर सेन्सर बसवले आहेत. कोणत्या गेटवर किती प्रवासी आहेत याची माहिती तत्काळ सीआयएसएफला मिळणार आहे. त्याचप्रमाणे सीटीआयएएक्स ही अद्यायावत मशीन बसवली आहेत. त्या मशीनमध्ये प्रवाशाने नेमके कोणत्या साहित्य ठेवले आहे, काही आक्षेपार्ह वस्तू बॅगेत लपवल्या आहेत का याची सहज माहिती मिळणार आहेत.

 सिव्हिल एव्हिएशन दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन नवीन सुरक्षेबाबत उपाययोजना केल्या आहेत. त्याचा फायदा सीआयएसएफला होणार आहे. मुंबई विमानतळावर विमानतळ प्राधिकरण, विमान पंपन्या आणि सीआयएसएफ हे एकत्र मिळून काम करत आहेत.
– श्रीकांत किशोर, उपमहानिरीक्षक, सीआयएसएफ,  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ युनिट