राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळा स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठय़ा प्रतीक्षेनंतर गुरुवारी शालेय शिक्षण विभागाकडून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 3 जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 125 व्या जयंतीदिनी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार होता. मात्र लगेच आज हे पुरस्कार स्थगित केले आहेत. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हा पुरस्कार सोहळा स्थगित करण्यात आला आहे. पुरस्कार सोहळ्याची नवी तारीख कालांतराने कळविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.

2021-22 च्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शालेय शिक्षण विभागाने 108 शिक्षकांची निवड केली आहे. या पुरस्कारात प्राथमिक 38, माध्यमिक 39, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक 18, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 8, विशेष शिक्षक (कला/क्रीडा) 2 , दिव्यांग शिक्षक व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक 1, गाईड शिक्षक 1 आणि स्काऊट शिक्षक 1 असे एकूण 108 पुरस्कार दिले जातात. या शिक्षक पुरस्कार यादीत मुंबईतील 8 तर ठाणे 4 आणि रायगड व पालघर जिह्यातील 3 शिक्षकांचा समावेश आहे.