
तमाम हिंदूंचे आराध्य दैवत असणाऱ्या प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर अयोध्येत बनत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अयोध्या येथील राम मंदिराची तारीख जाहीर केली आहे. त्रिपुरा येथे सुरू असलेल्या भाजपच्या जनयात्रेत ते बोलत होते.
या वेळी सभेत बोलत असताना शहा म्हणाले की, 1 जानेवारी 2024 रोजी राम मंदिर तयार होईल. त्रिपुरामधील नागरिकांनी आताच तिकीटाचं आरक्षण करून ठेवावं असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं. फक्त राम मंदिरच नाही, तर एक-दोन वर्ष जाऊद्या माँ त्रिपुरी सुंदरी देवीचेही भव्य असे मंदिर बनवू. ते पाहण्यासाठी जगभरातून लोक इथे येतील. आम्ही काशी विश्वनाथ कॉरिडोर बनवला. महाकाल कॉरिडोर बनवला. सोमनाथ आणि अंबा मातेचे मंदिर सोन्याचे होत आहे. माँ विंध्यवासिनीचे नवीन मंदिर बनत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
Ram temple will be ready on January 1, 2024, Amit Shah announces in Tripura
Read @ANI Story | https://t.co/pEHZTghUy1#RamTemple #AmitShah #ayodhyarammandir #Tripura #BJP pic.twitter.com/KKS89SocWm
— ANI Digital (@ani_digital) January 5, 2023
अनेक वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराच्या उभारणीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन केले आणि मंदिराची पायाभरणी केली. आता 1 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.
श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितले की, मंदिर निर्माण करण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. सध्या 350 मजूर आणि कारागीर दिवसरात्र काम करत आहेत. यासोबतच साधारण एक हजार मजूर आणि कारागीर राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील वंशी पहाडपूर येथे काम करत आहेत. या ठिकाणी मंदिरात वापरण्यात येणाऱ्या पाषाणांना आकार देण्याचे काम करत आहेत. इथूनच मंदिरासाठी लागणारे पिंक स्टोन आणले जाणार आहेत, अशीही माहिती मिश्र यांनी दिली.






















































