
देवगड तालुक्यातील प्रतिष्ठेची पंचवार्षिक निवडणूक शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस युती करून लढविण्याचा निर्णय देवगड येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. देवगड अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक देवगड शिवसेना कार्यालयात झाली. त्यात एकत्रित निवडणूक लढवण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
काँग्रेस शिवसेनेच्या सर्वच्या सर्व जागा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाप्रमुख आणि अर्बन बँकेचे माजी संचालक उल्हास मणचेकर, काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर शिवसेना नगरसेवक संतोष तारी, विशाल मांजरेकर,रोहन खेडेकर नितीन बांदेकर,धनंजय जोशी आदी या बैठकीस उपस्थित होते.






















































