हभप बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा झटका, रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यसनमुक्ती संघाचे प्रमुख ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा झटका आला आहे. साताऱ्यातील फलटण येथील निकोप रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या बंड्यातात्या यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

बंडातात्या कराडकर हे पुण्याहून कीर्तन करुन फलटण तालुक्यातील पिंप्रद इथल्या मठात आले होते. गुरुवारी सकाळी त्यांना अस्वस्थ जाणवू लागल्याने त्यांना फलटणच्या निकोप रुग्णालयामध्ये दाखवण्यात आले होते. त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखर खूपच वाढल्याने त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर त्यांचा एमआरआय आणि अँजिओग्राफी करण्यात आली. त्यात त्यांच्या मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत ब्लॉकेज असल्याचे दिसून आले.