वाहतुकीचे नियम पाळा, अन्यथा मी प्रतीक्षेत आहे! चंद्रपुरात यमराजाचा चालकांना सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकांमध्ये वाहतूक नियमांची जनजागृती व्हावी, अपघात मुक्त वाहनं चालवावी यासाठी आज चंद्रपूरच्या वाहतूक शाखेच्या वतीनं विशेष अभियान राबवण्यात आलं. विद्यार्थ्यांना सोबत घेत रेड्यासोबत यमाचे कपडे परिधान करून साक्षात यम रस्त्यावर हेल्मेट व सिट बेल्ट घालून वाहन चालवणाऱ्यांना यमा द्वारे गुलाबाचे फुल देण्यात आलं तर हेल्मेट व बिना बेल्ट न वापरणाऱ्यांना यमाने डोक्याला गदा मारला.

नियम पाळा, अन्यथा मी तयारच आहे, असा सल्ला यमराजानी दिला. चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी चौकात वेशभूषा केलेला यमराज चालकांची संवाद साधताना दिसून आला. या दरम्यान सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीचे फलक हातात घेत जनजागृतीच्या घोषणा दिल्यात. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटीलसह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.