शोध सत्याचा – जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी विज्ञानच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रसेन टिळेकर

समाजातील जाणत्या, ज्ञानी मंडळींनी केवळ बघ्यांची भूमिका न घेता समाजात मिसळून तत्परतेने योग्य ते प्रबोधन केलं पाहिजं, मंदिरात भक्ती करताना अशास्त्रीय वर्तन कुणी केलं तर विज्ञान त्याला धडा शिकवल्याशिवाय राहात नाही. कारण जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी म्हणजेच चराचरात विज्ञान भरलेलं आहे.

अंधेरी पूर्वेला पांढरपेशी मंडळींची मोठी वसाहत आहे. बहुसंख्य मंडळी उच्चविद्याविभूषित आहेत. त्या वसाहतीत माझे मित्र अरविंद वैद्य राहतात. ते नित्यनेमाने अत्रे कट्टय़ावर येऊन वेगवेगळय़ा विषयांवर बोलत, एके दिवशी दुपारी अकरा वाजता त्यांचा पह्न आला आणि ते मला म्हणाले, ‘‘टिळेकर साहेब, फार कामात नाही ना?’’, ‘‘नाही, आज अनायसे रविवार आहे, तेव्हा जरा निवांतच आहे. का हो?’’

‘‘मग जरा लवकर येता का? इथं आमच्या कॉलनीत मोठा बाका प्रसंग उभा राहिलाय, दंगल वगैरे होतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.’’

खरं तर नेहमी शांत अशा कॉलनीत दंगल वगैरे ऐकून मी चाटच पडलो, परंतु मी लगेच त्यांना ‘‘ठीक आहे, येतोच मी’’ असं म्हणून  लगबगीने त्या कॉलनीत पोहोचलो. जवळ जवळ शे-दीडशे लोकांचा जमाव प्रक्षुब्ध अवस्थेत जमा झालेला दिसला. मला पाहताच वैद्यसाहेब जमावातून बाहेर येऊन मला जरा दूर घेऊन गेले. त्यांनी मला जी घटना सांगितली ती खरंच दंगलीला कारणीभूत ठरावी अशीच होती.

त्या कॉलनीत एक हनुमान मंदिर होतं. ते भल्या पहाटे पाच वाजताच कुणीतरी उघडून आपल्या कामाला जायचं. एके दिवशी पहाटे काही भक्त नेहमीप्रमाणे मंदिरात गेल्यावर त्यांना धक्काच बसला. कारण मूर्तीचे दोन-तीन तुकडे होऊन ती खाली पडलेली होती. ते भक्त जवळ जवळ ओरडतच देवळाबाहेर आले, त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या बिल्डिंगमधील रहिवाशीही खाली आले आणि ती छिन्नविच्छिन्न मूर्ती पाहून हबकून गेले. पाहता पाहता मोठा जमाव जमा झाला. मग निरनिराळे तर्क-वितर्क सुरू झाले. बहुतेकांचे मत पडले की, हा नक्कीच देवाचा कोप आहे. कुणी म्हणाले, ‘बायकांनी खरं तर मारुती मंदिरात जाऊ नये, तो आजन्म ब्रह्मचारी आहे.’ बायकांचा विषय निघताच एक-दोन म्हाताऱया बायका पुढे आल्या आणि म्हणाल्या, ‘अहो, आपले लग्न लवकर जमावे म्हणून या न्हात्या-धुत्या तरुण पोरीही या देवळात जातात, मग मारुतीरायाचा कोप होईल नाही तर काय होईल?’

इथपर्यंत ठीक होतं, पण कुणीतरी हळूच बातमी पसरवली की, गेले दोन-तीन दिवस बाजूच्या वस्तीतले दोन-तीन तरुण टेहळणी करताना त्यांना दिसले होते. पेहरावावरून ते परक्या धर्मातले होते, तेव्हा हे त्यांचेच कृत्य असावे. हा कयास मात्र बहुतेकांना पटला, कारण मुंबईत नुकतीच मोठी दंगल होऊन गेली होती. कसं कुणास ठाऊक, पण इथे काय चर्चा चाललीय त्याची कुणकुण बाजूच्या मुस्लिम वस्तीतही लागली. तिथेही तरुणांचा मोठा जमाव सज्ज झालेला दिसला.

म्हणजे हे प्रकरण ताबडतोब मिटले नाही किंवा मिटवले नाही तर वैद्य म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच दंगलीची शक्यता निर्माण झाली होती.

नेमपं काय करावं या चिंतेत असताना अचानक आम्हाला देवळाच्या पायऱयावर एक ज्येष्ठ व्यक्ती दोन-तीन तरुणांसह उभी राहिलेली दिसली. लगेच वैद्य माझ्या कानात म्हणाले,

‘हे लिमये सर आहेत, ते मुंबई विद्यापीठाचे केमिस्ट्रीचे निवृत्त प्राध्यापक आहेत आणि ते दोन तरुण त्यांच्या हाताखाली पीएचडी करताहेत. नक्कीच ते या प्रकारावर योग्य तो प्रकाश टाकतील’… वैद्य म्हणाले तसंच झालं. सगळय़ांना ऐकायला जावे म्हणून लिमये सरांनी खडय़ा आवाजात बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले,

‘मित्रहो, आपण शांत व्हा! हा कुठलाही घातपाताचा प्रकार नाही, कुणीही खोडसाळपणा केलेला नाही. खरा प्रकार असा आहे की, मूर्ती संगमरवरी होती.

अशा मूर्तीच्या सर्वांगी छोटी छोटी छिद्रे असतात हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. बहुतांशी भक्तजन मूर्तीवर तेल, तूप, दही ओततात. हे द्रवपदार्थ त्या छिद्राद्वारे आत जाऊन विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होऊन मूर्तीच्या आतमध्ये कार्बन डायऑक्साईडसारखे वायू निर्माण करतात आणि त्यांच्या दाबामुळे मूर्ती दुभंगली आहे आणि खाली पडताना तिचे आणखी तुकडे झाले आहेत. खरं तर असं मूर्तीवर तेल, तूप, दूध, दही असे द्रव पदार्थ ओतू नयेत असं आपण अनेक भक्तांना सुचवलंही होतं, पण अनेक जणांना मूर्तीला स्पर्श केल्याशिवाय दर्शन घेतल्यासारखं वाटतच नाही. त्याला कोण काय करणार, पण विज्ञान आपली शिस्त सोडत नाही आणि अगदी मंदिरातही कुणी अशास्त्र्ााrय वर्तन केलं तर ते त्याला आपलं अस्तित्व दाखवल्याशिवाय राहात नाही. या प्रसंगातून तुम्हा-आम्हा सगळय़ांना एक बोध नक्की मिळतो तो म्हणजे, ‘जळी, स्थळी, काष्ठाr, पाषाणी विज्ञानच असतं.’ भक्तीलाही विज्ञानाची शिस्त पाळावी लागेल. तेव्हा अशी आंधळी भक्ती आपण थांबवू या आणि हो, ज्या मुलींना, स्त्र्ायांना मारुतीरायांची पूजा करायची असेल त्यांना कृपया कुणीही अडवू नये, पण त्याचबरोबर उपवर मुलींनी आणि त्यांच्या मातापित्यांनी हेही लक्षात ठेवावं की, असे मारुतीला साकडे घातल्याने त्या ब्रह्मचारी देवाची पंचाईत होईल आणि त्यायोगे तो हमखास लवकर स्थळ शोधून देईल या अंधश्रद्धेपासून दूर राहावे आणि सर्वात शेवटी महत्त्वाचं म्हणजे स्त्र्ााrच्या ठायी असलेला नैसर्गिक स्त्र्ााr-धर्म हा कुठल्याही देव-दर्शनाच्या, पूजा-अर्चेच्या आड येऊ शकत नाही आणि तसं केल्याने कुठलंही पावित्र्य भंग होत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं.’

लिमये सरांच्या स्पष्टीकरणानंतर मंडळी शांत झाली आणि हळूहळू जमाव पांगला. लिमये सरांच्या प्रबोधनपर भाषणामुळे एक मोठे अरिष्ट टळलं, जेव्हा एखाद्या अफवेतून, विशेषतः धार्मिक अढीतून निर्माण झालेल्या तणावामुळे रक्तपात होण्याची शक्यता असते. तेव्हा समाजातील जाणत्या, ज्ञानी मंडळींनी केवळ बघ्यांची भूमिका न घेता समाजात मिसळून तत्परतेने योग्य ते प्रबोधन केलं पाहिजं, जसे लिमये सरांनी केलं. दुसरं असं की, आपल्या भक्तीलाही शिस्त लावली पाहिजे. उदा. मंदिर थोडंसं दूर आहे तरी भररस्त्यातल्या धुळीत लोटांगण घालीत देवळात जाणं, मंदिरात गेल्यावर मोठय़ातली मोठी घंटा पाहून कानठळय़ा बसवणं, रात्री-अपरात्री वाद्यांच्या कर्कश आवाजात मूर्ती आणणे इत्यादी! शेवटी सगळय़ात महत्त्वाचं, प्रत्यक्ष मंदिरातही भक्ती करताना अशास्त्र् वर्तन कुणी केलं तर विज्ञान त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण ‘जळी, स्थळी, काष्ठाr, पाषाणी म्हणजेच चराचरात विज्ञान भरलेलं आहे.’

 [email protected]

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडीत आहेत)