
चीनची तथाकथित हेरगिरी करणाऱ्या बलूनला अमेरिकेने नष्ट केलं आहे. या पूर्वी हा बलून उत्तर अमेरिकेतील संवेदनशील लष्करी भागांवर पाळत ठेवत होता, असा दावा अमेरिकेने केला आहे. त्यामुळेच अमेरिकेने हवेतच हा बलून नष्ट केला आहे. आता यानंतर चीन-अमेरिकेत यांच्यातील संबंध पुन्हा ताणले जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने चीनच्या या बलूनला हवेतच नष्ट केलं. अमेरिकेच्या या कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बलून खाली येताना दिसत आहे. बलून नष्ट केल्यानंतर तो समुद्राच्या पाण्यातच पडावा, अशा पद्धतीने या कारवाईचे नियोजन करण्यात आलं होतं. नष्ट झाल्यानंतर या बलूनचे उर्वरित अवशेष जमा करण्यासाठी समुद्रात जहाजे तैनात करण्यात आली होती. जहाजांच्या माध्यमातून बलूनचे जास्तीत जास्त अवशेष जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
On Wednesday, when I was briefed on the (Chinese surveillance) balloon, I ordered the Pentagon to shoot it down…as soon as possible. They successfully took it down…I want to compliment our aviators who did it: US President Joe Biden in a White House Press Gaggle
(file pic) pic.twitter.com/hXUmlOOa5h
— ANI (@ANI) February 4, 2023
हा बलून सर्वांत अगोदर 28 जानेवारी रोजी अमेरिकेच्या हवाई हद्दीत आढळला होता. बलूनला उडवण्याच्या काही तासांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आम्ही या बलूनची काळजी घेऊ, असं म्हटलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी चीनने अमेरिकेच्या हवाई हद्दीत आढळलेला हा बलून आमचाच आहे, असं स्पष्ट केलं होतं. तसंच या बलूनच्या माध्यमातून पर्यावरणविषयक संशोधनक करण्यात येत असून तो चुकून अमेरिकेच्या हद्दीत गेला, असंही चीनने म्हटलं होतं. या घटनेमुळे मात्र अमेरिका-चीन यांच्या राजकीय, व्यापारी संबंधांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे




























































