
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक आव्हान दिले होते. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून त्यांच्या विरोधात लढण्यास सांगितले होते. त्या आव्हानानंतर आता गद्दार गट, त्यांचे मित्रपक्षातले नेते हडबडले आहेत. ते आता आदित्य ठाकरेंविषयी अपशब्द वापरत आहेत. त्याबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विट या गद्दारांवर हल्लाबोल केला आहे.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एका आमदाराने चॅलेंज दिल्यावर काहीजण असे हडबडलेत की, अख्खा गद्दार गट, त्यांच्या मित्रपक्षातले नेते आणि ‘आयटी सेल्स’ लगेच मला शिव्या देऊ लागले आहेत.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 5, 2023
”घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एका आमदाराने चॅलेंज दिल्यावर काहीजण असे हडबडलेत की, अख्खा गद्दार गट, त्यांच्या मित्रपक्षातले नेते आणि ‘आयटी सेल्स’ लगेच मला शिव्या देऊ लागले आहेत. हे हास्यास्पद आहे की ज्यांची नोंद 33 देशांनी घेतली ते स्वतः उत्तर देऊ शकत नाहीत, ना वेदांता वर, ना बल्क ड्रग पार्क वर, ना दाव्होसच्या ₹40 कोटींच्या खर्चावर” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच ”दुर्देव आहे की हाच राग आणि आवाज महाराष्ट्रद्वेष्ट्या राज्यपालांविरुद्ध कधी दिसला नाही. महाराष्ट्राचा अपमान होताना, महाराष्ट्राची लूट होताना लपलेले असतात” असा घणाघातही त्यांनी ट्विटरवरून केला आहे.
हास्यास्पद आहे की ज्यांची नोंद ३३ देशांनी घेतली ते स्वतः उत्तर देऊ शकत नाहीत, ना वेदांता वर, ना बल्क ड्रग पार्क वर, ना दाव्होसच्या ₹४०कोटींच्या खर्चावर!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 5, 2023






















































