टिव्ही अॅंकरने लाईव्ह टिव्हीवर केली घटस्फोटाची घोषणा, प्रेक्षकही झाले अवाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका महिला अॅंकरची हैराण करणारी घटना समोर आली आहे. या अॅंकरने लाईव्ह टिव्हीवर पॅनल डिबेट दरम्यान घटस्फोटाची घोषणा केली आहे. तिने अचानक केलेल्या घोषणेने तिथे उपस्थित पाहुण्यांसह प्रेक्षकही अवाक झाले. नेमकं काय झालं कोणालाच कळले नाही.

ज्युली बंडारेस असे त्या महिला अॅंकरचे नाव आहे. इंडिपेण्डेण्टच्या ऑनलाईन वृत्तानुसार, ही अॅंकर अमेरिकी चॅनल फॉक्स न्यूजमध्ये काम करते. ही संपूर्ण घटना एक लाइव्ह डिबेट दरम्यान घडली आहे. विशेष म्हणजे लाईव्ह टिव्हीवर घोषणा करण्यापूर्वी ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता आणि खाली फोटोओळ लिहीली होती, त्यात लिहीले होते की, आज रात्री 11 च्या शो च्या अखेर माझी एक छोटीसी अनाऊसमेण्ट आहे.

तिच्या या ट्विटनंतर प्रेक्षक विचार करु लागले नेमके ती काय घोषणा करणार. पण घटस्फोटाच्या घोषणेबाबत कोणी विचार केला नव्हता. तिच्या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. शोच्या होस्टने ज्युलीला विचारले की, नवऱ्याकडून व्हॅलेनटाईन डे ला काही विशेष भेट मिळणार आहे. याच्या ज्युलीने लाईव्ह टिव्हीवर ती घटस्फोट घेतली आहे.

ज्युलीने सांगितले की, ती आता पुढे आली आहे. सर्वांचे आभार आहे. एवढेच नाही ज्युलीने हेही सांगितले की, हीच ब्रेकिंग न्यूज आहे. तिच्या या घोषणेनंतर तर्कवितर्कांना सुरुवात झालीय. बोललं जातं की, खूप दिवसांपासून जोडीदारासोबत तिचे पटत नव्हते. त्यासाठी तिने लाइव्ह टिव्हीवर ऐलान केले. याबाबत लोकांपर्यंत स्पष्ट संदेश जावा आणि सर्वांना याची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी थेट टीव्हीवर याची घोषणा केली.