सचिन तेंडुलकर ताडोबात; तेथील व्यवस्था पाहून भारावला, पत्र लिहून केलं कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्याची ओळख वाघांचा जिल्हा अशी आहे. खुल्या वनक्षेत्रातही वाघ हमखास नजरेत पडतो. मात्र ताडोबातील वाघांची बातच निराळी. इथल्या वाघानी आपल्या करामतींनी जगाच लक्ष वेधलं. देशातीलच नव्हे तर जगातील सेलिब्रिटी ताडोबातील वाघाच्या प्रेमात आहेत. ताडोबातील वाघांच्या प्रेमात आणखी एक सेलिब्रिटी म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर. ताडोबाची हमखास सफारी सचिन तेंडुलकर करीत असतो. सध्या तेंडुलकर पत्नी अंजली सोबत तीन दिवसाच्या ताडोबा सफारीवर आलेला आहे. यादरम्यान सचिन,अंजलीन एक पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी आपला अनुभव व्यक्त केला आहे .

ताडोबात फिरताना पाच मोठे वाघ बघायला मिळाले, तो अनुभव रोमांचक होता. हे अत्यंत व्यवस्थितपणे हाताळलं जाणारं जंगल आहे. आम्ही एका छोट्याशा कुटीत राहिलो होतो आणि तिथली स्वच्छता खासकरून वॉशरूम पाहून आम्ही भारावून गेलो. त्यासाठी इथल्या व्यवस्थापनाचे अभिनंदन. आम्ही राहत होतो तिथल्या अध्याक्षांपासून ते सर्व स्टाफ त्यांचे काम चोख पार पाडत आहेत. जंगल संवर्धनासाठी एकत्र काम करत आहेत. त्यांच्या या कामाची आम्हालाच अनपेक्षितपणे मदत होत आहे. यामुळे वाघ बघायला मिळण्याच्या संधीही वाढत जात आहेत” अशा शब्दात सचिन तेंडुलकरने ताडोबा व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे.