
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी अत्यंत हीन दर्जाच्या भाषेचा वापर केला. त्यामुळे शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. अर्ज दाखल करताना शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे, सुनील मोदी, विनोद खोत, संदीप दळवी, युवराज खडांगळे आदी उपस्थित होते.




























































