
‘महाज्योती’कडून दोन वर्षाचे टॅब वाटप सुरू आहे. टॅब वाटपाचा मेसेज एक दिवसा आधी विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून देण्यात आला. त्यामुळं समाजकल्याण कार्यालयात आज सकाळी पासून विद्यार्थ्यांनी पालकांसह एकच गर्दी केली आहे. टॅब घेण्यासाठी आलेले विद्यार्थी सकाळपासून रांगेत ताटकळत उभे आहेत. समाज कल्याण कार्यालयात टॅब देण्यात येत आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. टॅब वाटपाचे काम कार्यालयात एकाच टेबल वरून सुरू असल्याने गोंधळ सुरू असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितलं. अकरावी आणि बारावीच्या विध्यार्थीना MH-CET, JEE, NEET चे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यासाठी टॅब वाटप केले जात आहे.































































