
पुद्दुचेरी येथे एका दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र कोणी प्रदान करायचे यावरून विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी भांडताना एक भाजप आमदार कॅमेऱ्यात कैद झाला.
केंद्रशासित प्रदेशात विद्यापीठाचा 29 वा दीक्षांत समारंभ मंगळवारी आयोजित करण्यात आला होता, जेथे वेळापत्रकानुसार, लेफ्टनंट गव्हर्नर तमिलिसाई सौंदरराजन आणि सीएम रंगासामी सहभागी होणार होते आणि विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करणार होते.
मात्र, या कार्यक्रमाला केवळ गृहमंत्री नमाचिवायम, मंत्री साई सरवणन, खासदार वैथिलिंगम आणि सेल्वागणपथी आणि कल्याणसुंदरम आमदार उपस्थित होते.
लेफ्टनंट गव्हर्नर आणि मुख्यमंत्री दोघेही उपस्थित नसल्यामुळे कार्यक्रम आयोजकांनी जेआयपीएमईआरचे (JIPMER) संचालक राकेश अग्रवाल यांना पदवी प्रमाणपत्र वाटपासाठी बोलावले होते.
यावरून संतापलेल्या भाजप आमदार कल्याणसुंदरम यांनी मंचावर वाद घातला आणि मंत्री आणि लोकांनी निवडून दिलेले इतर मान्यवर स्टेजवर असताना JIPMER संचालकांना पदवी प्रमाणपत्र वाटपासाठी का बोलावण्यात आले, असा सवाल केला आणि हा अपमान असल्याचे म्हटले. ‘तुम्ही कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहात’, असे कल्याणसुंदरम आमदार ओरडले.
कल्याणसुंदरम आमदार ओरडत असतानाच JIPMER संचालक पदव्या वाटताना दिसले. नंतर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी गृहमंत्री नामचिवायम यांना विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्याची विनंती केली.


























































