
अभिनेत्री सुष्मिता सेन हिला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. तिनेच सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच आपली अँजिओप्लास्टी झाल्याचेही तिने सांगितले. आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो पोस्ट करत सुष्मिता म्हणाली, ‘तुम्ही तुमच्या हृदयाला कायमच खंबीर आणि आनंदी ठेवा. कारण तुमच्या वाईट काळात ते कायमच तुमच्या पाठीशी उभे राहील. हा सल्ला मला माझ्या वडिलांनी दिला होता,’ असे तिने म्हटलेय.





























































