
चंद्रपूर जिल्ह्यात शांततेत धुलिवंदनाचा उत्साह पार पडत असतानाच शहरातील सर्व मटण मार्केट मध्ये मटण घेण्यासाठी ग्राहकांनी अफाट गर्दी केली आहे, या गर्दीमुळे मटण मार्केट समोरील रस्ता वाहनांच्या पार्किंगने बंद होऊन गेल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरातील भिवापूर परिसरातील मटण मार्केटमध्ये भररस्त्यावरच बकऱ्यांची कत्तल केली जात आहे. या सर्व गोष्टींकडे प्रशासन डोळेझाक करून बसले आहे. धुळवडीच्या दिवशी दिवसभर या मार्केटमध्ये शेकडो बकरे कापले जातात.



























































