जागतिक महिला दिन विशेष, ‘तिची’ तारेवरची कसरत सुरूच; घर, ऑफिस, मुलांच्या संगोपनात वाहून घेते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला ग्रामीण भागातील असो की शहरातील, घराबरोबरच घराबाहेरची काही कामे करून घराला हातभार लावण्याचे काम ती आजही न बोलता करत असते. घर, ऑफिस आणि मुलांच्या संगोपनात स्वतःला वाहून घेते. मात्र, आजही समाजाचे ऋण फेडण्यासाठी ती न बोलता पुढाकार घेत असते, तर कधी पोस्टवुमनसारखी वेगळी वाट चोखाळून, जबाबदारीचे भान ठेवत कर्तव्य बजावत असते. मात्र हे सर्व करताना तिची तारेवरची कसरत काही थांबलेली नाही.

 जबाबदारीचे भान

घरात असू दे किंवा घराबाहेर जबाबदारी नेटाने पूर्ण करायची हा स्त्र्ााrचा गुणधर्म. पोस्टवुमन अनुराधा त्यापैकीच एक. गेली 40 वर्षे त्या अंधेरी भागात पत्र वाटप करत आहेत. एकीकडे कर्त्या पुरुषांप्रमाणे त्या घर सांभाळत आहेत. दुसरीकडे फिल्डवर नेटाने नोकरी करत आहेत.

 वयाच्या 18 व्या अनुराधा पोस्टात टेम्पररी म्हणून कामाला लागल्या. तब्बल 10/12 वर्षे नोकरी केल्यानंतर त्या पर्मनंट झाल्या. घरात कमावणारे फक्त वडील आणि खाणारे आठ जण. दहावीचे शिक्षण कसेबसे पूर्ण केल्यानंतर त्या पोस्टात कामाला लागल्या. हल्ली व्हॉट्सअॅप किंवा पह्नवर एका सेपंदात संवाद साधता येतो, पण त्यावेळी प्रत्येक जण एकेका पत्राची आवर्जून वाट बघत असत. त्यामुळे अनुराधा यांनी आपल्या कामाचे महत्त्व जाणून कधीच त्यात चालढकल केली नाही. भर पावसात त्यांनी कामे केली आणि अजूनही करत आहेत. अशात कित्येकदा बिटमध्ये कामे करताना त्या घसरून पडल्या आहेत. कित्येक वेळा त्यांना बिटमध्ये मोकाट व पाळीव श्वान चावले, पण त्यांनी नेटाने काम सुरू ठेवले. पार्सलचे वजन जास्त असले तरी सर्व ओझे घेऊन त्या संपूर्ण त्यांची बिट फिरत. इतर काही कामे उद्यावर ढकलू शकतो, पण हे काम म्हणजे माणसांच्या भावभावनांशी जोडलेले आहे. ते वेळीच पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्या जाणतात. पतीच्या साथीशिवाय त्या काwटुंबिक जबाबदाऱयाही नेटाने सांभाळत आहेत.

  • मृदा झरेकर, म. ल. डहाणूकर कॉलेज

महिला खलाशांसाठी ‘वुमेन ऑफ सी’ नेटवर्क!

महिला खलाशांना-सीफेरर्सना त्यांचे करीअर करण्यासाठी आणि आव्हांनावर मात करण्यासाठी त्यांना ज्ञान, अनुभव, मार्गदर्शन आणि सहकार्य मिळावे यासाठी जगातील सर्वात अग्रेसर शिप मॅनेजमेंट पंपनी अँग्लो-ईस्टर्न ग्रुपने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘अँग्लो-ईस्टर्न वुमेन ऑफ सी’ नेटवर्क लाँच केले आहे. हाँगकाँगमध्ये मुख्यालय असलेल्या आणि भारतीय खलाशांना रोजगार देण्यात आघाडीवर असलेल्या अँग्लो-ईस्टर्न ग्रुपने ‘मेरीटाईम इंडस्ट्री’तील स्त्र्ााr-पुरुष असमानतेची समस्या सोडवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे, अशी माहिती मुंबईतील अँग्लो-ईस्टर्न शिप मॅनेजमेंट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक महेश प्रधान यांनी दिली.

अँग्लो-ईस्टर्न ग्रुपमध्ये सध्या 189 महिला सीफेरर्स कार्यरत असून त्यांपैकी 65 हिंदुस्थानी नागरिक असून अनेक महिला या महाराष्ट्रीय आहेत. जगभरातील विशेष मालवाहू जहाजांमध्ये या महिला सीफेरर्स वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

कहाणी अमर्त्य पेशींची

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने मराठी विज्ञान परिषदेने ‘कहाणी अमर्त्य पेशींची’ हे अभिवाचन आयोजित केले असून वंदना अत्रे आणि शोभना भिडे या सादर करणार आहेत. बुधवार, 8 मार्चला दुपारी 3.30 ते 5 या वेळेत हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनाशुल्क असल्याने महिलांनी त्याचा लाभ घ्यावा.  स्थळ ः मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी.

महापालिकेचा 8 फुटी सेल्फी पॉईंट

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुलाब, शेवंती, डेझी आणि जिप्सोफीला फुलांचा 8 फुटी उंच आणि 5 फूट लांबीचा सेल्फी पॉईंट मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर उभारण्यात आला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने ही आकर्षक प्रतिकृती तयार केली आहे. सेल्फी पॉईंट तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली बहुतांश फुले ही महापालिका उद्यानांमधील आहेत. त्याचबरोबर सुमारे 500 पेक्षा अधिक गुलाब आणि शेवंतीच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. डेझी आणि जिप्सोफिला या फुलांचे प्रत्येकी 10 गुच्छ यासाठी वापरण्यात आले आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

‘मनातली जाणीव’ अंकानिमित्त विशेष कार्यक्रम

सोनल खानोलकर संपादित ‘मनातली जाणीव’ दिवाळी अंकाच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘जाणीव उद्याची-स्त्र्ााr मनाची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महिला सन्मान सोहळा रविवार, 12 मार्च 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजता दादरमधील छत्रपती शिवाजी मंदिर नाटय़गृहात होणार आहे. प्रवेश विनामूल्य आहे. महिला, युवतींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दान करावे असे…

असे म्हणतात दान करताना एका हाताचे दुसऱया हातालाही कळता कामा नये. अगदी याच तत्त्वानुसार बोरिवलीच्या शुभदा पुरव यांचे सामाजिक कार्य गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गरीब, वृद्ध, नेत्रहीन, दिव्यांग आणि निराधारांसाठी शुभदा पुरव नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. कुणाला काही वैद्यकीय किंवा इतर मदत हवी असेल तर शुभदा यांचा नंबर दिला जातो. कित्येकदा त्या स्टेशनवर अंध-अपंगाना खाण्याची पाकिटे वाटताना दिसतात. कुठलीही संस्था नाही की, कुणाचे आर्थिक पाठबळ नाही. जेवढी खिशाला झेपेल तेवढी मदत करायची हा त्यांचा नित्यनेम. दान करून त्याचा बाजार मांडणाऱया तथाकथित दानशूरांपेक्षा शुभदा पुरव निश्चितच वेगळय़ा वाटतात.

बोरिवली येथे राहणाऱया शुभदा पुरव मूळच्या अलिबाग येथील. इतरांना समजून घेणे. त्यांच्या अडीअडचणीला धावणे हा त्यांचा स्वभाव. शाळेत असल्यापासूनच गरजूंच्या मदतीला धावणे ही त्यांची सवय. मोठे असे काही नाही, पण महिन्याला 3 हजार 500 रुपये कमवत असतानाही त्यातील किमान एक हजार रुपये गरजूंच्या कसे उपयोगी पडतील हे त्यांनी पाहिले. त्यांची कोणतीही संस्था नाही किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर नाही. तरीही त्या गरजू ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि निराधारांपर्यंत पोचतात. शुभदा चर्चगेटला कामाला आहेत. कोणतेही सण असो किंवा त्यांच्या कुटुंबात कुणाचा वाढदिवस असो, त्या जेवणाची 20 ते 25 पाकिटे बनवून घेतात आणि प्लॅटफॉर्मवर अंध-अपंगांना, वयोवृद्धांना जेवू घालतात. वरचे वर त्यांचा हा उपक्रम चालूच असतो. त्या आपल्या संपका&तील व्यक्तींची मदत घेऊन रुग्णांना उपचार करण्यासाठी प्रयत्न करतात. कोविड काळातही जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत कशी पोचेल, यासाठी त्यांची बरीच धडपड चालू होती. आदिवासी पाडे, झोपडपट्टय़ांमध्ये जेवढे शक्य होईल, तेवढी मदत त्यांनी केली. त्यांनी ‘नन्हे कदम’ हा उपक्रम एक महिना राबवून ते गोळा केलेले सर्व कपडे अनाथ आश्रम आणि आदिवासी पाडय़ांमध्ये वाटून दिले. आज  कोणालाही जर जुने कपडे किंवा काहीही दान करायचे असेल तर ते शुभदा यांना पह्न करतात. आपल्या कामातून त्यांनी ही विश्वासार्हता निर्माण केली आहे.

  • मानसी पिंगळे, म. ल. डहाणूकर कॉलेज