गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनी जायबंदी, स्नेह राणाकडे नेतृत्व; लॉरा वोल्वार्डचा संघात समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेला नुकतीच सुरुवात झालेली असताना गुजरात जायंट्स संघाला मोठा झटका बसलाय. कर्णधार बेथ मुनी जायबंदी झाल्याने उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूच्या जागेवर आता दक्षिण आप्रैकेची लॉरा वोल्वार्डचा संघात समावेश करण्यात आला असून, स्नेह राणाकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

गुजरात जायंट्स महिला प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. या संघाने आत्तापर्यंत 3 सामने खेळले असून दोन पराभव व एक विजय मिळविला आहे. गुजरातला त्यांच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर बुधवारी संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पहिला विजय मिळाला. महिला प्रीमियर लीगच्या लिलावात गुजरात जायंट्स संघाने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला 2 कोटी रुपयांना खरेदी करून संघाचे कर्णधार बनविले होते. मुनी ही महिला बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. त्यामुळे दुखापतीमुळे ती उर्वरित स्पर्धेला मुकल्याने गुजरात जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे.